Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीIndian Navy : ८वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही नौदलात मिळणार नोकरीची संधी

Indian Navy : ८वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही नौदलात मिळणार नोकरीची संधी

३००हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

मुंबई : अनेकजण त्यांच्या आयुष्यात सरकारी नोकरीच्या शोधात असतात. त्यातच तरुण पिढी भारतीय नौदलात (Indian Navy Jobs) नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. अशातच भारतीय नौदलाने तरुणांना नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नौदलाने तब्बल ३००हून अधिक शिकाऊ पदासांठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे.

असा करा अर्ज

उमेदवार indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात. २४ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० मेपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी फक्त आठवी आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण असलेले तरूणही अर्ज करू शकणार आहेत.

या पदांसाठी होणार भरती

भारतीय नौदलात वेगवेगळ्या ३०० शिकाऊ पदांसाठी भरती होणार आहे. यात फिटर पदासाठी ५०, मेकॅनिक पदासाठी ३५, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी २६ जागा आहेत. शिपराइट १८, वेल्‍डर १५, मशीनिस्‍ट १३, एमएमटीएम १३, पाईप फिटर १३, पेंटर ९, इंस्ट्रूमेन्ट मेकॅनिक ७, शीट मेटल वर्कर ३, टेलर ३, पॅटर्न मेकर २, फाऊन्ड्रीमॅन पदासाठीदेखील एक जागा आहे.

वयोमर्यादा काय, शिक्षणाची अट काय?

भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीसाठी किमान वयाची अट ही १४ वर्षे आणि कमाल वयाची अट ही १८ वर्षे आहे. बिगर आयटीआय ट्रेडसाठी इयत्ता आठवी पास असणे गरजेचे आहे. फोर्जर हीट ट्रिटर या पदासाठी इयत्ता १० पास असणे गरजेचे आहे.

शारीरिक योग्यतेची अट काय?

या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराची उंची ही १५० सेमी तर वजन ४५ किलोपेक्षा कमी नसावी. तसे छाती फुगवल्यानंतर ती ५ सेमीपेक्षा कमी नसावी. डोळ्यांची दृष्टी ही ६/६ पासून ६/९ पर्यंत असणे गरजेचे आहे.

निवड कशी होणार, पगार काय मिळणार?

भारतीय नौदलात वरील पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अगोदर उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल. त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झाल्यास उमेदवाराला प्रतिमहिना ७७०० ते ८०५० रुपयांचे स्टायपंड मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -