Sunday, April 20, 2025
HomeदेशBreach of Code of Conduct : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस व भाजपा...

Breach of Code of Conduct : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस व भाजपा अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस!

२९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

नवी दिल्ली : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, काहीवेळेस राजकीय नेत्यांकडून विरोधी टीका करताना आचारसंहितेचा भंग (Breach of Code of Conduct) केला जातो. या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसकडून (BJP VS Congress) एकमेकांविरोधात निवडणूक आयोगात (Election Commission) तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याची दखल घेत दोन्ही पक्षांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

समाजात द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, जात, धर्म आणि भाषेच्या आधारे भेदभाव करणे अशा प्रकारचे आरोप एकमेकांविरोधात करण्यात आले होते. या प्रकरणी निवडणूक आयोगाने पक्षाध्यक्षांना जबाबदार ठरवत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये २९ एप्रिलच्या सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने याप्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा अनुच्छेद ७७ चा वापर करत स्टार प्रचारकांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी पक्षाच्या अध्यक्षांना जबाबदार धरलं आहे. त्यानुसार, आयोगाने दोन्ही अध्यक्षांच्या नावावर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये आयोगाने सांगितलं आहे की, राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपले उमेदवार आणि स्टार प्रचारकांना संयमित भाषेचा वापर करण्यास सांगावे. मोठ्या पदावर बसलेल्या लोकांच्या भाषणाचा मोठा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे अशा लोकांनी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी.

काय होत्या तक्रारी?

भाजपने राहुल गांधींच्या एका भाषणावर आक्षेप घेत आयोगाकडे तक्रार केली होती. तर, दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका भाषण धार्मिक, जातीवादी आणि धर्माच्या नावावर द्वेष पसरवणारे होते असे म्हणत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने सर्वांना संयम ठेवून वक्तव्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त झालेल्या नोटिसीवर काँग्रेस आणि भाजप काय उत्तर देतं हे पाहावं लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -