Monday, April 21, 2025
Homeक्रीडाIPL 2025RCB vs SRH: बंगळुरुच्या गोलंदाजीसमोर हैदराबादची दांडीगुल, तब्बल ३५ धावांनी विजय...

RCB vs SRH: बंगळुरुच्या गोलंदाजीसमोर हैदराबादची दांडीगुल, तब्बल ३५ धावांनी विजय…

RCB Vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने सलग तिसऱ्या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले. विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या अर्धशतकीय कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबाद (SRH) समोर 207 धावांचे लक्ष्य उभे राहिले.

हैदराबादच्या दोन्ही धडाकेबाज सलामीवीरांसोबत एडन मार्कराम याला  पॉवरप्लेमध्ये परत पाठवून बंगळुरूच्या संघाने सणसणीत सुरुवात केली. पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेड तर चौथ्या षटकात अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर पाचव्या षटकात बेंगळुरूचा नवोदित गोलंदाज स्वप्नील सिंगने मार्कराम आणि हेनरिक क्लासेन यांची दांडीगुल केली. एसआरएचने या मोसमात पहिल्यांदाच पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावल्या आहेत.

हैदराबादच्या फलंदाजांनी मोठ्या फटकेबाजीची प्रतिष्ठा कायम ठेवण्याच्या प्रयत्नात  एका पाटोपाट एक अश्या विकेट गमावल्या. कर्ण शर्माने नितीश रेड्डी आणि अब्दुल समद यांना परत पाठवले, हे दोन हैदराबादच्या संघातील नावाजलेले भारतीय फलंदाज आहेत. हैदराबादसाठी कोणताही खेळाडु मोठी खेळी करु शकला नाही. त्यामुळे २० षटकांमध्ये हैदराबाद केवळ १७१ धावा बनवू शकले. बंगळुरुने हैदराबादवर तब्बल ३५ धावांनी विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -