दिंडोरी : ओझरखेड शिवारात हॉटेल श्रीहरी जवळ झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्मचारी ठार झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मॅक्स टॅक्सी क्रं. एमएच १५ / ई २१३२ ही नाशिकहून वणीकडे येत असताना समोरून येणारी हुन्दाई कंपनीची व्हरना कार क्रं. एमएच १५ / डीएम ९१८३ यांच्यात धडक झाली.
यात व्हरना कार मधील ज्ञानेश्वर नारायण रौंदळ वय (५२) व रेणुका भिकाजी कदम (४६) हे रा. पोलीस वसाहत, शहर आयुक्तालय, नाशिक हे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली गायधनी यांनी तपासून मृत घोषीत केले.
याबाबत वणी पोलिसांनी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत आहेत.