Thursday, July 10, 2025

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

मराठवाड्यातील ३ तर विदर्भातील ६ मतदारसंघात शुक्रवारी मतदान


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी होणार आहे. तत्पूर्वी आज बुधवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात मराठवाड्यातील ३ आणि विदर्भातील ५ मतदारसंघांचा समावेश आहे.


गेल्या बारा ते तेरा दिवसापासून या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या. तर जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची, विद्यमान खासदाराला तिकीट नाकारण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ओढवलेल्या दोन मतदारसंघांचा देखील यात समावेश आहे.


मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तिन्ही मतदारसंघांत तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ-वाशीम, बुलडाणा, अकोला आणि वर्धा या पाच मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यात व विदर्भातील दोन्ही मतदारसंघात सभा घेतल्या.

Comments
Add Comment