Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीRBI Action : आरबीआयची कडक कारवाई! 'या' बँकेतील ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यावर...

RBI Action : आरबीआयची कडक कारवाई! ‘या’ बँकेतील ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी बँकांविरोधात कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. आरबीआयने (RBI) आयडीएफसी फस्ट बँक (IDFC First Bank), एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance) तसेच शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र (Shirpur Merchants Co-operative Bank) यावर आरबीआयने कारवाई केली होती. त्यानंतर आरबीआयने आता आणखी एका बँकेवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. या बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

आरबीआयने केलेल्या कारवाईनुसार, कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर बैंकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम 35A अन्वये निर्बंध २३ एप्रिल २०२४ (मंगळवार) रोजी कामकाज बंद झाल्यापासून लागू झाले आहेत. या निर्बंधांमुळे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय बँक कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही. कोणीही गुंतवणूक करू शकत नाही. कोणतेही दायित्व हस्तांतरित करू शकत नाही किंवा त्याच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही.

बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता ठेवीदाराच्या सर्व बचत खात्यांमध्ये किंवा चालू खात्यामध्ये किंवा इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, परंतु कर्जाचे समायोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ग्राहकांना मिळणार ५ लाख रुपये

बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. पात्र ठेवीदारांना ठेव विमा व पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) त्यांच्या ठेवींमधून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळणार आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत निर्बंधांसह बँकिंग व्यवहार सुरूच राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -