
मुंबई: हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया(akshay tritiya) साजरी केले जाते. यावर्षी १० मे २०२४ला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जात आहे.
अक्षय्य तृतीयेचा सण हा हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. याला दिवाळी आणि धनत्रयोदशीप्रमाणेच शुभ मानले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णूची पुजा केली जाते.
या दिवशी सोने खरेदीही केली जाते. अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र यावर्षी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होत आहे यात काही राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे.
अक्षय्य तृतीया २०२४चे शुभ योग
१० मेला अक्षय़्य तृतीया साजरी केली जाणार आहे. ३ राशींसाठी ही शुभ असणार आहे आणि त्यांना धनवान बनवेल. यासोबतच अक्षय्य तृतीयेला वृषभ राशीत चंद्र आणि गुरू युतीने गजकेसरी योगही बनेल. या दिवशी सूर्य आणि शुक्र युती मेष राशीत होणाऱ्या शुक्रादित्य योगही बनेल.
सोबतच मंगळ आणि बुधच्या युतीने धनयोग, शनिच्या कुंभ राशी असण्याने शश योग आणि मंगळ मीन राशी राहवून मालव्य राजयोग बनेल. अक्षय्य तृतीयेला या योगांमध्ये ३ राशींना खूप लाभ होणार आहे.
मेष रास
अक्षय्य तृतीयेला बनत असलेल्या धन योगामुळे मेष राशीला आर्थिक लाभ होईल. तसेच करिअरमध्येही वाढ होईल. सोबतच कौटुंबिक जीवनही आनंदी राहील. तुम्हाला भूमी-भवनचा लाभ होऊ शकतो.
वृषभ रास
अक्षय्य तृतीयेचा दिवस वृषभ राशींसाठी वरदानासारखा असेल. धन, नोकरी आणि व्यापारात खूप प्रगती होईल. तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल. भविष्यात केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल.
मीन रास
अक्षय्य तृतीयेला बनत असलेला शश योग आणि मालव्य योगामुळे मीन राशीला धन आणि संपत्तीचे लाभ होण्याचे योग बनत आहेत. सोबतच तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. यश तुमच्या हातीच आहे.