
नम्रता संभेरावने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भडकला प्रसाद खांडेकर; दिली अशी प्रतिक्रिया!
मुंबई : प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या विनोदी कार्यक्रमातील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर. ते साकारत असलेली कोहली फॅमेली किंवा इन्स्पेक्टर आणि सुरकीचं स्किट अशा या जोडीच्या प्रत्येक परफॉर्मन्सने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचा ऑस्ट्रेलिया दौरा झाला. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची अजूनही चर्चा आहे. कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार ऑस्ट्रेलियातील मजेशीर व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच नम्रता संभेरावने ऑस्ट्रेलियातील प्रसाद खांडेकरचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून प्रसादने, “रुको…सबका बदला लेगा रे पश्या”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. नम्रताने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान चर्चेत आहे.
नम्रता संभेरावने इन्स्टाग्रामवर प्रसादचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या व्हिडिओला सध्या गाजत असलेलं 'माझ्याशी ही नीट बोलायचं' हे रॅप लावलं आहे. या व्हिडीओत प्रसाद पेंगताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं की, “सॉरी, कँट्रोल नाही झालं पश्या. हा ऑडिओ खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी ही पोस्ट करतेय. (btw हा व्हिडिओ jet lag मधला होता. आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, तेव्हाचा आहे ) बाकी पश्याला आळस येत नाही, तो खूप उत्साही आहे. माझं काही खरं नाही.”
प्रसाद स्वतःचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून म्हणाला, “रुको नम्रता. इसका करारा जवाब मिलेगा…सबका बदला लैगा रे पश्या.” प्रसादच्या या प्रतिक्रियेवर नम्रताने हसण्याचे इमोज शेअर केले आहेत. दरम्यान, तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “बिचारे प्रसाद सर”, “नम्रता आता तुझी वेळ आली आहे. तयार राहा”, अशा कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram