MI vs RR: राजस्थानने मुंबईला ९ विकेटनी हरवले, संदीपच्या 'पंजा'ने केली कमाल

मुंबई: आयपीएल २०२४चा(ipl 2024) ३८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ९ विकेटनी शानदार विजय मिळवला. सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्यांदा बॅटिंग करताना १७९ धावा केल्या होत्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने यशस्वी जायसवालच्या शानदार खेळीच्या जोरावर १९व्या षटकांतच पूर्ण केले.

मुंबई इंडियन्ससाठी सलामीला उतरणारा रोहित शर्मा आणि इशान किशन फ्लॉप ठरला. रोहितने ५ बॉलमध्ये ६ धावा केल्या आणि तो बाद झाला. तर किशन शून्यावर बाद झाला. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमार यादवनेही ८ बॉलमध्ये १० धावा केल्या. यानंतर तिलक वर्मा आणि नेहाल वधेरा यांचे वादळ पाहायला मिळाले. तिलकने मुंबईसाठी शानदार फलंदाजी केली आणि ४५ बॉलमध्ये एकूण ६५ धावा केल्या.

मोहम्मद नबीने काही वेळ त्याची साथ दिली त्याने १७ बॉलमध्ये २३ धावा केल्या. आयपीएल २०२४च्या आपल्या पहिल्याच सामन्यात नेहालने कमालीची फलंदाजी केली. नेहाल २४ बॉलमध्ये ४९ धावा करत बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान ४ षटकार आणि ३ चौकार लगावले. कर्णधार हार्दिक पांड्या १० बॉलमध्ये १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

संदीप शर्माच्या पाच विकेट


संदीप शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना एकूण ५ विकेट घेतल्या. संदीपने आपल्या स्पेलमध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड आणि जेराल्ड कोएत्जे यांची विकेट घेतली. संदीपने आपल्या ४ षटकांत एूण १८ धावा दिल्या.
Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख