Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीHoroscope : हनुमान जन्मोत्सव दिन 'या' राशींसाठी असणार लाभदायक तर 'या' राशीतील...

Horoscope : हनुमान जन्मोत्सव दिन ‘या’ राशींसाठी असणार लाभदायक तर ‘या’ राशीतील लोकांना बसणार फटका

जाणून घ्या तुमची रास काय म्हणते?

मुंबई : प्रत्येक दिवसाची सुरवात नव्या स्वरुपात होत असते. तुमच्या मनासारखा दिवस जाण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार की नाही, हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून तुमचा आजचा दिवस किंवा आठवडा कसा आहे हे राशिभविष्याच्या माध्यमातून सांगितलं जातं. त्यातच पंचांगानुसार आज हनुमान जयंतीचा दिवस अनेकांसाठी शुभदायक ठरणार आहे मात्र या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीतील लोकांना अडचणी सहन कराव्या लागणार आहेत. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

मेष

आजच्या दिवसाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आनंदी असेल, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही तुमच्या कपाळावर आठ्या दिसणार नाहीत.

वृषभ

आज भाग्याची साथ चांगली मिळणार आहे. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कुटुंबातील सदस्यांना दिलेली आश्वासने तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल. तुमचे मूल तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल.

मिथुन रास

आज तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. कोणत्याही नवीन योजना अंमलात आणायची घाई करू नका. नोकरी धंद्याच्या ठिकाणी अचानक कामे मिळणे अथवा जाणे काही गोंधळ निर्माण होणे अशा शक्यता आहेत.

कर्क रास

आजचा दिवस तुमच्या पराक्रमाला ऊर्जा देणारा ठरेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल. तुम्ही जोडीदारासोबत काही आनंदाचे क्षण घालवाल. भावंडांशी थोडे मतभेद संभवतात. प्रवासाचे योग येतील.

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतल्यास, तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांशी चर्चा करावी. कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या कामाचे नियोजन करा. नोकरी धंद्यात आपल्याबरोबरचे लोक पुढे जात आहेत आणि आपण मात्र आहोत तिथेच आहोत असा थोडासा अनुभव येईल.

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. सामाजिक कार्यात प्रगती कराल. तुम्हाला नवीन पद देखील मिळू शकते. तुमच्या आजूबाजूला काही नवीन शत्रू असतील, पण तुमच्या कामाने प्रभावित होऊन ते तुमचे मित्र बनतील. एकाच वेळी अनेक कामे करायची योजना आखल्यास तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचा एखादा विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतो. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.

तूळ

आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील आणि तुम्ही आनंदाने भरून जाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा घ्याल. तुमच्या आयुष्यात नवीन पाहुणे येऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी कळेल. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रासाठी काही प्रकारची व्यवस्था देखील करू शकता. महिलांनी त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा.

वृश्चिक

नोकरी धंद्याच्या ठिकाणी जरा जास्तच कष्ट पडतील. वरिष्ठांनी आश्वासन दिले तरी ते लगेच पूर्ण होणार नसल्याने त्यात फारसा रस तुम्ही घेणार नाही. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहणार आहे. तुम्ही जेथे काम करता तेथे अचानक काही बदल संभवतात. अशावेळी तुमच्याशिवाय त्यांचे काही चालणार नाही. महिलांनी आपला दृष्टिकोन बदलायला हवा.

मकर

आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतार घेऊन येईल. आर्थिक गोष्टींमध्ये थोडी अनिश्चितता दाखवते. मित्रमंडळींशी भांडणाचे प्रसंग उद्भवतात. महिला अति व्यवहारी बनतील.

कुंभ

आज धर्मादाय कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांच्या बदलीमुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. भाऊ आणि बहीण तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील, परंतु तुमच्या कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. तुमच्या आत उर्जा असेल, पण जर तुम्ही ती योग्य कामांसाठी वापरली तर ते तुमच्यासाठी चांगले होईल.

मीन

आज दुसऱ्याला स्वातंत्र्य देताना हात थोडा आखडताच घ्याल. स्वतःचा विचार जरा जास्तच कराल. महिलांची सतत काहीतरी नवीन शिकण्याची धडपड राहील. तुमच्यासाठी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा दिवस असेल. तुम्ही तुमचे खर्च मर्यादित ठेवावे, अन्यथा आर्थिक स्थिती अस्थिर होऊ शकते. नवीन नोकरी मिळाल्यास मन प्रसन्न राहील. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -