Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीHanuman Jayanti 2024: आज आहे हनुमान जन्मोत्सव, या शुभ मुहूर्तावर करा संकटमोचनची...

Hanuman Jayanti 2024: आज आहे हनुमान जन्मोत्सव, या शुभ मुहूर्तावर करा संकटमोचनची पूजा

मुंबई: हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सव खास असतो. हिंदू पंचागानुसार हनुमान जन्मोत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला साजरी केली जाते. यावेळेस हनुमान जन्मोत्सव २३ एप्रिलला साजरी केली जात आहे. अंजना आणि केसरी यांचे पुत्र हनुमान यांना वानरदेवता, बजरंगबली आणि वायदेव या नावांनीही ओळखले जातात.

आज देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हनुमानाला त्याची अपार शक्ती आणि ताकदीसाठी पूजन केले जाते. हनुमानाला विविध नावांनीही ओळखले जाते. जसे मारूती, बजरंगबली, पवन पुत्र, वीर हनुमान, संकटमोचन, केसरीनंदन अशीही नावे हनुमानाची आहेत.

हनुमान जन्मोत्सव २०२४ शुभ मुहूर्त

हनुमान जयंती पोर्णिमा तिथी २३ एप्रिलला सकाळी ३ वाजून २५ मिनिटांनी सुरू झाली आहे आणि तिथीची समाप्ती २४ एप्रिलला म्हणजेच उद्या सकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी होईल. ज्योतिषांच्या मते हनुमान जयंतीची पुजा अभिजीत मुहूर्तामध्ये करणे शुभ मानले जाते. अभिजीत मुहूर्त आज सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांपासून दुपारी १२ वाजल्यापासून ४६ मिनिटांपर्यंत राहील.

हनुमान जन्मोत्सवाचा पहिला मुहूर्त

आज सकाळी ४ वाजून २० मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत राहील.

दुसरा मुहूर्त – सकाळी ९ वाजून ३ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील.

तिसरा मुहूर्त रात्री असेल – रात्री ८ वाजून १४ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल.

अशी करा हनुमानाची पुजा

आधी श्रीरामाचा मंत्र ऊं राम रामाय नम:चा जप करा. त्यानंतर हनुमानाचा मंत्र ऊं हं हनुमते नम:चा जप करा.

हनुमान जयंतीचे खास उपाय

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानासमोर तूप अथवा राईच्या तेलाचा दिवा लावा. तसेच ५ ते ११ वेळा हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे जीवनातील प्रत्येक समस्येपासून सुटका मिळते.

हनुमान मंदिरात जाऊन या दिवशी देवाची विधीवत पुजा करा. सोबतच बजरंग बाणचे पठण करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -