Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीरात्री दुधात मिसळून खा ही एक गोष्ट, शरीर होईल ताकदवान

रात्री दुधात मिसळून खा ही एक गोष्ट, शरीर होईल ताकदवान

मुंबई: दूध हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. हा पोषकतत्वांचा चांगला स्त्रोत आहे. दुधाला संपूर्ण आहार मानले जाते. मात्र दुधासोबत अनेक हेल्दी गोष्टी मिसळून खाल्ल्याने त्याचे पोषणमूल्य अधिक वाढते.

दूध आणि मखाणा यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमने भरपूर असतात यामुळे ते एकत्र खाल्ल्याने याचे फायदे दुपटीने वाढतात.

दूध आणि मखाणा एकत्र खाल्ल्याने पोटासाठी चांगले असते कारण या दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच यामुळे पाचनशक्ती सुधारते आणि पोटाचे आजार दूर होतात.

मखाणा घातलेले दूध तुमची हाडे आणि दातांचे आरोग्य चांगले राखतात. कारण दूध आणि मखाणे या दोन्हीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते जे हाडे स्वस्थ आणि निरोगी राखण्यास मदत करतात. यामुळे दातही मजबूत होण्यास मदत होते.

मखाणा आणि दुधाचे सेवन हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कारण या दोन्हींमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. यामुळे ब्लड प्रेशरसारखे त्रास नियंत्रणात ठेवण्यास मदत तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राखतात.

दूध आणि मखाणा एकत्र खाल्ल्याने थकवा, अशक्तपणासारख्या समस्याही दूर होतात. यामुळे तुम्हाला लगेचच एनर्जी मिळते.

व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंटने भरपूर असल्याने हे ड्रिंक तुमच्या मेंदूलाही निरोगी ठेवते. तसेच मेंदूचे कार्यही वेगवान करते.

दूध आणि मखाणा एकत्र खाल्ल्यास शरीरास व्हिटामिन ए, ई आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात मिळतात यामुळे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. हे एक प्रकारे अँटी एजिंग ड्रिंक प्रमाणे काम करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -