Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीEarthquakes: निसर्गाचा कहर, एका दिवसांत ८० वेळा भूकंपाचे धक्के

Earthquakes: निसर्गाचा कहर, एका दिवसांत ८० वेळा भूकंपाचे धक्के

तैपेई: तैवानच्या(taiwan) पूर्व किनाऱ्यावर पुन्हा भूकंपाचे जोरदार हादरे बसले. येथे सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारपर्यंत भूकंपाचे तब्बल ८० हून अधिक धक्के बसले. यातील सर्वात मोठ्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाच्या या सातत्याच्या धक्क्याने तेथील लोक चांगलेच घाबरले आहेत. दरम्यान, यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

याआधी महिन्याच्या सुरूवातीला याठिकाणी ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात १३ जणांचा मृत्यू झाला होता तर एक हजाराहून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या २५ वर्षातील तैवानमधील हा सगळ्यात मोठा भूकंप होता. यानंतर अनेक झटके या ठिकाणी बसले आहेत.

३ एप्रिलला आलेल्या भूकंपानंतर येथील एका हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते. सोमवारी रात्री आलेल्या भूकंपानंतर ते हॉटेल आणखी खाली वाकले आहे.

तैवान हा देश दोन टेक्टोनिक प्लेटो जंक्शनजवळ स्थित आहे. २०१६मध्ये दक्षिण तैवानमध्ये आलेल्या मोठ्या भूकंपामध्ये १०० हून अधिक लोक मारले गेले होते तर १९९९मध्ये आलेल्या ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये २ हजाराहून अधिक लोक मारले गेले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -