मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. बीसीसीआयची लीग आयपीएलमधूनही तगडी कमाई करते. आयपीएलमुळेच अनेक खेळाडूंनाही भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळते. साधारणपणे खेळाडूच्या पगाराबाबतची माहिती समोर येते. मात्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या पगाराबद्दल फार कमी लोकांना माहीत असते.
बीसीसीआयमध्ये जय शाह हे नाव नेहमीच चर्चेत असते. मात्र यासोबत त्यांच्यासह मंडळामध्ये अनेक महत्त्वाची लोक काम करतात. जय शाह सचिव आहेत. तर रॉजर बिन्नी अध्यक्ष आहेत. राजीव शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. जर आयपीएल पाहिली तर याचे चेअरमन पद अरूण धुमळ यांच्याकडे आहे.
रिपोर्टनुसार बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना पगाराच्या रूपात दरवर्षी साधारण ५ कोटी रूपये मइळतात. रिपोर्टनुसार माजी अध्यक्ष सौरव गांगुलीलाही इतकाच पगार मिळत होता. तर सचिन आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनाही चांगली रक्कम मिळते.
एका रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मासिक पगार मिळत आहे तर दिवसाच्या हिशेबाने भत्ता मिळतो. रिपोर्टनुसार बोर्डाच्या सर्व सदस्यांना दर दिवशीच्या हिशेबाने एका बैठकीसाठी ४० हजार रूपये मिळतात. हा भत्ता आयपीएल चेअरमनवरही लागू होतो.
जय शाहच्या पगाराबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र रिपोर्टनुसार त्यांनाही दर दिवसाच्या हिशेबाने भत्ता मिळतो. जर ते परदेशी दौऱ्यावर गेले तर हा भत्ता वाढतो. यासोबतच येण्या-जाण्यासाठी बिझनेस क्लासचे तिकीटही मिळते.