Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Bank Holidays : मे महिन्यात 'या' दिवशी असणार बँका बंद, एकूण ११ दिवसांचा समावेश

Bank Holidays : मे महिन्यात 'या' दिवशी असणार बँका बंद, एकूण ११ दिवसांचा समावेश

मुंबई : आगामी १ मे २०२४ पासून नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मे महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडेचे कॅलेंडर जारी केले आहे. शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि इतर प्रसंगांशी संबंधित सुट्ट्या देखील बँकेच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बँकेच्या सुट्टीची यादी एकदा तपासून पहा.

आगामी मे महिन्यात अनेक सण असल्यामुळे पुढच्या महिन्यांतील सुट्ट्यांची संख्या जास्त आहे. आगामी महिन्यात कामगार दिन आहे, त्यानंतर रविंद्रनाथ टागोर, नझरुल यांची जयंती आहे. अक्षय्य तृतीयादेखील आहे. त्यामुळे संपूर्ण देशात बँका साधारणपणे ११ दिवस बंद असतील.

काही सुट्ट्या त्या-त्या राज्यांपुरत्या मर्यादित

मे महिन्यात बँका एकूण अकरा दिवस बंद असल्या तरी या दिवसांत ऑनालाईन बँकिंगची सुविधा चालू असणार आहे. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची कामे करता येतील. काही सुट्ट्या या त्या-त्या राज्यांपुरत्या मर्यादित आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसांत बदल होऊ शकतो.

'या' दिवशी असणार बँका बंद

१ मे - महाराष्ट्र दिन, कामगार दिन ५ मे - रविवार ८ मे - रविंद्रनाथ टागोर यांची जयंती (पश्चिम बंगाल) १० मे - बसव जयंती (कर्नाटक) ११ मे - दुसरा शनिवार १२ मे - रविवार १६ मे -स्टेट डे (सिक्कीम) १९ मे - रविवार २३ मे - बुद्ध पौर्णिमा २५ मे - नझरुल जयंती, चौथा शनिवार २६ मे - रविवार

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >