Tuesday, April 29, 2025

विदेशताज्या घडामोडी

फोटो घेण्याच्या नादात धगधगत्या ज्वालामुखीमध्ये पडली महिला

फोटो घेण्याच्या नादात धगधगत्या ज्वालामुखीमध्ये पडली महिला

मुंबई: आजकाल लोक जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांचे लक्ष त्या ठिकाणाकडे कमी आणि फोटो काढण्याकडे जास्त असते. मात्र अनेकदा असे करणे त्यांना खूपच भारी पडते. असेच एका महिलेसोबत घडले आहे. ती आपल्या नवऱ्याकडून फोटो काढून घेत होती तेव्हा २५० फूट उंचावरून ती धगधगत्या ज्वालामुखीमध्ये पडली. हे प्रकरण इंडोनेशियामधील आहे. ही महिला चीन येथून फिरण्यास पर्यटक म्हणून आली होती. ३१ वर्षीय हुआंग लिहोंग असे या महिलेचे नाव आहे.

स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार हुआंग आणि तिचे पती झांग योंग एका स्थानिक गाईडच्या मदतीने वर चढत होते. ज्यामुळे ती ज्वालामुखीच्या किनाऱ्यावर उभी राहून सूर्योदय पाहू शकेल. त्याचवेळेस तिचे पती हुआंगला काही फोटो क्लिक करायचे होते. मात्र अचानक ती अडखळले आणि किनाऱ्यावर उभी असताना मागे खाली पडली.

ती पडल्यानंतर जारी केलेल्या फोटोमध्ये ती एक पाय वर उचलताना ज्वालामुखीच्या किनाऱ्यावर पोझ देताना दिसत होती. हुआंगच्या मागे वाफा आणि सल्फर गॅस वर येताना दिसत होते. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार ज्वालामुखीच्या जवळ ७५ मीटर(२५० फूट) खोल खाली कोसळली आणि तिचा मृतदेह बाहेर काढण्यास दोन तासाहून अधिक वेळ लागला.

बानुवांही क्षेत्रातील संरक्षण विभागाचे प्रमुख द्वी पुत्रो सुगियार्तोने स्थानिक मीडियाला सांगितले की हुआंगचा मृत्यू हा एक अपघात होता. यामुळे पर्यटकांनी यातून धडा घेतला पाहिजे की माऊंट इजेज चढताना आपल्या सुरक्षेप्रती सतर्क राहावे. माऊंट इजेन पूर्व जावामध्ये बानुवांगी आणि बोंडोवोसो यांच्यातील सीमेवर ज्वालामुखींचा समूह आहे.

Comments
Add Comment