मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत स्किनसंबंधी तक्रारी सुरू होतात. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही याच्या ज्यूसचे सेवन करू शकता. कोरफडीच्या रसाच्या सेवनाने तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेला हायड्रेट ठेवू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळा कडक असल्याने स्किन चिकट तसेच तेलकट होऊ लागते. अनेकदा घामामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्याही येतात. यामुळे सुंदरता कमी होते. अशातच तुम्हालाही तुमची स्किन हायड्रेट ठेवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा ज्यूसबद्दल सांगणार आहोत जो पिऊन तुम्ही त्वचा हायड्रेट ठेवू शकता. जाणून घ्या या ज्यूसबद्दल…
Summer special: उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावर क्रीम लावावी की नाही? घ्या जाणून
उन्हाळ्याच्या दिवसांत कोरफडीचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने तुम्ही त्वचेला हायड्रेट ठेवू शकता. दररोज याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्याही कमी होण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामध्ये मॉश्चराईजिंगचे गुण असतात जे त्वचा स्वस्थ राखण्यास मदत करतात.
कोरफडीच्या रसामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात जे त्वचेची सूज आणि लालसरपणा कमी करतात. हे जेल व्हिटामिन, खनिज आणि अँटीऑक्सिडंटने भरपूर असते जे त्वचेसाठी फायदेशीर असते. कोरफडीचे जेल त्वचेची जखम भरून काढण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर होणारी अॅलर्जी, रॅशेस आणि फोड कमी होतात.
दरम्यान, कोरफडीचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची जरूर काळजी घ्या. काही लोकांना कोरफडीची अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.