Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात लांगुलचालन; उद्या महिलांच्या मंगळसुत्रापर्यंतही पोहोचतील!

Nitesh Rane : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात लांगुलचालन; उद्या महिलांच्या मंगळसुत्रापर्यंतही पोहोचतील!

भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात

‘जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी’ हे ठाकरेंचं ब्रीदवाक्य; ठाकरेंच्या प्रचारगीतावर लगावला टोला

मुंबई : ‘कर्नाटकमध्ये काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील सत्यपरिस्थिती जनतेपर्यंत आणि प्रामुख्याने आमच्या माताभगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये लांगुलचालनाचा जो काही प्रकार सुरु आहे, त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसुत्रापर्यंत काँग्रेस आणि इंडिया अलायन्सचे नेते पोहोचतील’, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करणार्‍या संजय राऊतांचा (Sanjay Raut) नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत आज सकाळी पंतप्रधानांविषयी निर्लज्जपणे बोलतो की हे महिलांच्या मंगळसुत्रापर्यंत पोहोचले आहेत. आता बोलण्याआधी भांडुपच्या देवानंदने स्वतःचा इतिहास पाहावा, नाहीतर डॉ. स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा आमच्या माताभगिनींच्या किती मंगळसुत्रापर्यंत पोहोचलेला आहे, हे आम्हाला बाहेर आणावं लागेल. रॉयल फार्म्स गोरेगावमध्ये काय काय झालं होतं, मनसुख हिरेनचा खून तुझ्या मालकाच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाला, दिशा सालियनची लग्नापूर्वी गँगरेप करुन हत्या झाली, तेव्हा या सगळ्या प्रकरणांत मंगळसूत्राची आठवण झाली नाही?, असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या बोलण्याचा संदर्भच संजय राऊतला कळला नाही. काँग्रेसची चाटण्यामध्ये याच्या जिभेचं हाडच तुटून गेलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

काही दिवसांपूर्वी लखनौच्या एका प्रॉपर्टीसंदर्भात इन्कम टॅक्स आणि ईडीने मोठी कारवाई केली. ती प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर यांची होती. हा श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरेंचा मेहुणा आहे. म्हणजे जो काही थयथयाट सुरु आहे, भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी खालच्या पातळीची टीका सुरु आहे, ती देश किंवा महाराष्ट्राच्या प्रेमामुळे नव्हे तर मेहुणा आता जेलमध्ये जाणार त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भुंकणं सुरु आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

आम्ही संजय राऊतची असंख्य उदाहरणं बाहेर काढू

संजय राऊतांच्या मंगळसूत्रावरील टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान मोदींना या देशात राहत असलेल्या माताभगिनींची एक मोठा भाऊ म्हणून चिंता आहे, आणि त्यासाठीच त्यांनी सावध राहा असं काळजीने म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलण्याची संजय राऊतने हिंमत करु नये, अन्यथा आम्हाला त्याची असंख्य उदाहरणं बाहेर काढावी लागतील. मग त्याची मंगळसूत्रावर बोलायची पात्रताच उरणार नाही. त्याच्यासारखा शक्ती कपूर कोणाच्या घरात घेण्याच्या लायकीचा नाही, असं नितेश राणे म्हणाले.

महिलांबाबत संजय राऊतने थोबाड उघडू नये

संजय राऊतने एका महिलेला आपण ऐकू शकत नाही इतक्या घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या, तिच्यामागे हेर लावले, तिच्या घरावर दारु बोटल्स फेकायला लावल्या, हे सगळं आम्ही बाहेर काढू. गोरेगावच्या रॉयल फार्म्समध्ये, न्यूझीलंड हाऊसमध्ये काय झालं हेही आम्हाला सांगावं लागेल. नवनीत राणा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तू महिलांबाबत कसं बोलतोस हे आम्हाला चांगलंच कळलं आहे. म्हणजे तू घरातल्या महिलांशी कसं बोलत असशील, त्यांना काय उपमा देत असशील याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या वक्तव्यातून देतोयस. त्यामुळे महिलांबाबत त्याने थोबाड उघडू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी

निवडणूक आयोगाने ठाकरेंच्या प्रचारगीतातल्या ‘भवानी’ या शब्दावर घेतलेल्या आक्षेपावर नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आजवर हिंदू देव-देवतांचा वापर हा खंडणी गोळा करण्यासाठीच केला आहे. त्यांचं ब्रीदवाक्यच आहे ‘जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी’. हिंदू देवांची नावं वापरण्याची त्यांची लायकी राहिलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला आक्षेप योग्य आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -