Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा' चित्रपटाची सेन्सॉर बोर्डाकडून अडवणूक!

एकाही दृश्यावर आक्षेप नाही; मात्र...


मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आणि सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारलेला 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yoddha Movie) यावर्षी २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाची गाणी रिलीज झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मात्र, एका कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाकडून (Censor Board) अडवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एकाही दृश्यावर आक्षेप घेतलेला नाही. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली आचारसंहिता, मतदान आदींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार 'संघर्षयोद्धा' चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.



चित्रपटाच्या टीमने काय म्हटले?


निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, 'हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे. आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याचं दुःख होत आहे'. तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारा अभिनेता रोहन पाटील म्हणाला की, 'हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट होणार'.



आता कधी प्रदर्शित होणार चित्रपट?


हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल, असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. चित्रपटाच्या टीमने अंतरवाली सराटी येथे ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या. यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितले की, आपला चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने थांबवला असला, तरी २१ जून २०२४ या नव्या तारखेला सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट पाहील. चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मी लवकरच माझ्या वेळेनुसार पत्रकार परिषद घेऊन चित्रपटा विषयी बोलेन असंही त्यांनी म्हटलं.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय