Friday, May 23, 2025

देशमहत्वाची बातमी

Health Insurance: आता कोणत्याही वयात मिळणार Health Insurance, आजारीही खरेदी करू शकणार पॉलिसी

Health Insurance: आता कोणत्याही वयात मिळणार Health Insurance, आजारीही खरेदी करू शकणार पॉलिसी

मुंबई: इंश्युरन्स सेक्टरचे रेग्युलेटर आयआरडीएआयने हेल्थ इन्शुरन्स(health insurance) पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकणार आहेत. यामुळे म्हातारपणादरम्यान लोकांना उपचारामध्ये मोठी मदत होईल. सध्याच्या घडीला जास्त वयाच्या लोकांना हेल्थ इन्शुरन्सचा लाभ मिळत नव्हता.



सर्वाधिक ६५ वयाचा नियम हटवला


आयरडीएआयने कमाल वयाची मर्यादा हटवून हेल्थकेअर सिस्टीम सर्वांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सुकर केला आहे. आता कोणीही अगदी सोप्य पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स प्लान्स खरेदी करू शकणार आणि अचानक येणाऱ्या आजाराचा खर्च करू शकतात. जुन्या गाईडलाईन्समध्ये नवी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी केवळ ६५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींनाच खरेदी करता येत होती. मात्र आयरडीएआयचे हे नवे नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत.



आजारी व्यक्तीलाही मिळणार हेल्थ इन्शुरन्स


विमा कंपन्यांना अशी उत्पादने विकावी लागतील जी प्रत्येक वयाच्या लोकांसाठी लागू असतील. सोबतच कंपन्यांना वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि मातृत्वाला लक्षात घेता अशी उत्पादने आणावी लागतील. तसेच आधीपासून आजारांशी झुंजणाऱ्या व्यक्तींच्या हिशेबाने कंपन्यांना विमा पॉलिसी आणावी लागेल. आयरडीएआयने आधीच स्पश्च केले की कंपन्या कॅन्सर, हार्ट, तसेच एड्ससारख्या आजारांशी लढणाऱ्या लोकांना हेल्थ इन्शुरन्स देण्यापासून मनाई करू शकत नाही.

Comments
Add Comment