Friday, December 13, 2024
Homeमहत्वाची बातमीThackeray Vs Shinde : ठाकरे गटाचे विश्वासू मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना साथ...

Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाचे विश्वासू मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना साथ देणार?

दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मिळण्याची शक्यता

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनेक मोठ्या आणि विश्वासू नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ दिली. हा ओघ कमी होत नसून ठाकरे गटाला मात्र गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, खासगी सचिव आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दक्षिण मुंबईतून (South Mumbai) लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांना साथ देण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याविरोधात शिवसेनेकडून लढण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांना ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबईतून महायुतीकडून मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यशवंत जाधव निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र अद्याप महायुतीकडून उमेदवार घोषित नाही, ही जागा शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुटण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मिळण्याची शक्यता

मिलिंद नार्वेकर हे बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पक्षासाठी काम करत आहेत. मिलिंद नार्वेकर यांची ओळख ठाकरे कुटुंबातील हनुमान अशी झाली आहे. पक्षावर जेव्हा-जेव्हा संकट आलं तेव्हा नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष सोडल्यास ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ठाकरेंची काही गुपिते दडलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या जाण्याने ठाकरेंसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -