काव्यरंग

माझी लेखणी


आयुष्याच्या पानावर
लेखणीने चित्र रेखाटले...
प्रेम, करूणा, त्यागाचे
त्यात रंग मी भरले...

जपते मी लेखणीला
जीवापलीकडे फार...
हाती लागू नये कुणाच्या
शस्त्र हे अति धारधार ...
लेखणीतून माझ्या
प्रसवल्या किती कविता...
बांध घालूनी शब्दांचा
वाहे जणू निर्मळ सरिता...

मानमर्यादेचे कुंपण
लेखणीने घातले स्वतःला...
करू नकोस अपमान कुणाचा
निक्षून सांगते मजला...

लेखणीने माझ्या मी
गणित आयुष्याचे सोडते...
राग, लोभ, मत्सर
जीवनातून वजा करते...

- शिल्पा चऱ्हाटे, मुंबई


शेत


माती न्हातीधुती होते
सोनं केवढा लेऊनी
नाचे गवताच पातं
फुलपाखरू होऊनी

शिवारात मातीला गं
येतो चंदन दर्वळ
जोंधळ्याच्या कणसात
मोती भरले बक्कळ

पाखरांचा येतो थवा
दाणे खाण्यास शेतात
बळी गोफण घेऊन
उभा राहे दिनरात

आला मोहर आंब्याला
कोकिळेचा सूर घुमे
बोरं, चिंचा जांभळाचा
गंध रानी घमघमे

रान तुरा डोलू लागे
साऱ्या शिवारात धुंद
पिकाकडे पाहाताना
बळी लुटतो आनंद

- मानसी जोशी

Comments
Add Comment

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती

चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरे पूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची

धीर धरी...

आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानू टीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल? संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच

आत्मप्रतिष्ठेचं भान

स्मृतिपटल; अनिल तोरणे कोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णी माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या