Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : संजय राऊतला ज्या ताटात खातो त्याच ताटात घाण करण्याची...

Nitesh Rane : संजय राऊतला ज्या ताटात खातो त्याच ताटात घाण करण्याची सवय!

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोन पिसाळलेले कुत्रे

आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : ‘नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज काही ना काही तरी भुंकत बसलेले असतात. एक काल धारावीमध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे भुंकत होता आणि आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडुपमध्ये बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बोलत होता’, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सातत्याने भाजपावर करत असलेल्या टीकांचा नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊतच्या म्हणण्याप्रमाणे आदरणीय देवेंद्रजींची प्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनण्याची स्वप्नं होती. त्यामुळेच त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं. संजय राऊतला सांगेन की आमचे फडणवीस साहेब हे तुझ्यासारखे नीच प्रवृत्तीचे नाहीत. ज्या ताटात तू खातोस त्याच ताटात घाण करण्याची सवय तुला आहे. २०१९ ला राहुल कनाल आणि त्याचे सहकारी म्हणाले, की नालायक राऊतला २०१९ सालीच मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं होती. ज्याला कोणी बिल्डिंगच्या वॉचमनची नोकरी देणार नाही, त्याला राज्याचा मुख्यमंत्री बनायचं होतं. त्यासाठी काही आमदारांची याने सामनामध्ये बैठक बोलावली होती, आणि त्यांना सांगितलं की माझं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा. म्हणजे एका बाजूला याचा मालक मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहत होता, तर दुसरीकडे हा नालायक, नमकहराम स्वतःला मुख्यमंत्री बनवण्यासाठी आमदारांना राजी करत होता, असा आरोप नितेश राणे केला.

काल धारावीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की जिथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे. कोणत्याही कामाला जाताना आम्ही आधी त्या खोलीमध्ये नतमस्तक होऊन जातो. मग उद्धव ठाकरेंना आठवण करुन देईन, की त्या खोलीमध्ये बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्या शेवटच्या दिवसांत तू आणि तुझ्या कुटुंबियांनी काय अवस्था करुन ठेवली होती, याची माहिती महाराष्ट्राला दे. उद्धव ठाकरेचं कुटुंब बाळासाहेबांना वेळेवर औषध, जेवण द्यायचं नाही, त्यांना घाणेरड्या उपमा द्यायचं. मग तेव्हा खोलीचं पावित्र्य कळलं नाही का? असा परखड सवाल नितेश राणे यांनी विचारला.

हा नेमका आता राजाराम राऊतांचा मुलगा आहे का?

राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं कारण त्यांना सत्तेचा लोभ नाही, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, याचा अर्थ राहुल गांधींकडून भांडुपच्या घरी वेळेवर पगार पोहोचतो आहे. कधी पवार साहेबांच्या नावाने लाल टपकवायची, कधी उद्धव ठाकरेचे तळवे चाटायचे, कधी राहुल गांधींची लाल करत बसायचं, हा नेमका आता राजाराम राऊतांचा मुलगा आहे का, यावर आता संशोधन झालं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेने स्वतःचं कुटुंब सांभाळलं तरी खूप आहे

उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाची भूमिका निभावू शकतात, असंही संजय राऊत म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी टोले लगावले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्या बिल्डिंगच्या वॉचमनची नोकरी बरोबर करु शकणार नाही, त्याला तुम्ही देशाचा पंतप्रधान बनवताय? जो माणूस स्वतःचं घर चालवू शकत नाही, त्याचा एकही नातेवाईक त्याच्याशी नीट बोलत नाही, त्याचा चेहरा बघत नाहीत, तो देश चालवण्याची भाषा कशी करु शकतो? त्याने स्वतःचं कुटुंब सांभाळलं तरी खूप आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -