
मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहे जे विविध रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यात अनेक फायदेही आहेत.
आज आम्ही तुम्हाला जिओचा ३ महिन्यांचा व्हॅलिडिटी असलेल्या सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत.
हा रिचार्ज प्लान तुम्हाला पेटीएम, फोनपे आणि गुगल पे इत्यादीवर मिळणार नाही. जाणून घेऊच्या जिओच्या या खास रिचार्जबद्दल...
जिओचा स्वस्त रिचार्ज
जिओच्या व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये ३९५ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. या किंमतीमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे ही साधारण ३ महिन्यांइतकी आहे.
जिओ युजर्सला ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच यात लोकल आणि एसटीडी कॉल सामील आहेत.
जिओच्या ३९५ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल. हा फायदा त्या लोकांसाठी ज्यांना कॉलिंगचा फायदा हवा आहे.
किती मिळणार एसएमएस
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण एक हजार एसएमएस मिळतात. यामुळे कम्युनिकेशनचेही काम असते.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन नाही मिळणार.
जिओच्या वेबसाईटवर जाऊन प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला व्हॅल्यू कॅटेगरी दिसेल. या कॅटेगरीमध्ये एकूण तीन प्लान आहेत यात एक महिन्याचा दुसरा ८४ दिवसांचा आणि तिसरा वार्षिक.