Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL 2024: हैदराबादने दिल्लीला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये केला मोठा बदल

IPL 2024: हैदराबादने दिल्लीला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये केला मोठा बदल

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने(sunrisers hyderabad) आयपीएल २०२४च्या(ipl 2024) ३५व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवले. अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने ६७ धावांनी विजय मिळवला. हैदराबादने या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल केला. विजय मिळवल्यानंतर हैदराबादने मोठी उडी घेतली आहे.


हैदराबादने दिल्लीला हरवत या हंगामातील पाचवा विजय मिळवला. यासोबतच ते १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आले आहे. तर हरणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ ६ पॉईंट्स आणि -०.४७७ नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. दिल्लीचा या हंगामातील हा पाचवा पराभव आहे.



हे आहेत पॉईंट्स टेबलमधील टॉप ४ संघ


टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत ७ पैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे. यानंतर सनरायजर्स हैदराबाद १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायजर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स ८-८ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाताकडे १.३९९ आणि चेन्नईकडे ०..५२९ चा नेट रनरेट आहे.



बाकी संघाची अशी स्थिती


लखनऊ सुपर जायंट्स ८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लखनऊकडे ०.१२३चा रनरेट आहे. तर मुंबई इंडियन्, दिल्ली कॅपिट्ल्स, आणि गुजरात टायटन्स ६-६ गुणांसह अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

Comments
Add Comment