
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ईडी आणि सीबीआय केवळ आपले काम म्हणजे भ्रष्टाचाराचा सपात करत आहे आणि कोणीही त्यांना रोखू नये. विरोधी पक्ष करत असलेल्या आरोपावर मोदींनी हे उत्तर दिले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भ्रष्टाचाराचा तपास करणे ईडी आणि सीबीआयचे काम आहे. उदाहरणार्थ जर तिकीट तपासनीस रेल्वेमध्ये तिकीट तपासत असेल तर तुम्ही त्याला रोखणार का? ईडी-सीबीआयला त्यांचे काम करू द्या. एक पंतप्रधान म्हणून मलाही ईडीच्या कामात दखल देण्याचा कोणताही अधिकार नाही.
मोदी पुढे म्हणाले, जर ईडी आणि सीबीआय आपले काम करत नसेल तर सवाल उचलले गेले पाहिजेत. मात्र येथे विरोधी पक्ष विचारत आहेत की एजन्सी आपली कामे का करत आहे. तसेच ईडीकडून दाखल झालेले केवळ ३ टक्के प्रकरणे ही राजकीय व्यक्तींविरोधातील आहेत. बाकी ९७ टक्के प्रकरणे ही बिगर राजकीय व्यक्तींच्या विरोधातील आहे. याबाबत कोणी काहीच का बोलत नाही असे म्हणत त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले.
२०१४ नंतर १.२५ कोटींची संपत्ती जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४ आधी ईडीने १८०० केसेस दाखल केल्या होत्या. या तपास विभागाने २०१४ पासून ते आतापर्यंत ७००० ठिकाणी छापे टाकले. याआधी केवळ ८४ सर्च करण्यात आले होते. २०१४ नंतर १.२५ लाख कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली.
भ्रष्टाचाराने देशाची वाट लावली
पंप्रधान मोदींनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात असल्याचा केंद्रावरी आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावला. ते म्हणाले, इमानदार व्यक्तीला कशाचीच भीती नसते. मात्र भ्रष्टाचारामध्ये सामील लोकांना पापाची भीती असते. भ्रष्टाचाराने देशाची वाट लावली. त्यामुळे तो समूळ नष्ट करायला हवा असे मोदी म्हणाले.