Wednesday, July 2, 2025

Heat Waves:उन्हात खूप वेळ राहात असाल तर होऊ शकतो कॅन्सर, असा करा बचाव

Heat Waves:उन्हात खूप वेळ राहात असाल तर होऊ शकतो कॅन्सर, असा करा बचाव

मुंबई: संपूर्ण देशभरात उष्णतेची मोठी लाट आली आहे. कडक उन्हामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे सर्वच लोक त्रस्त झाले आहेत. उन्हामुळे लोकांना उष्णतेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. बरेचजण ड्रिहायड्रेशनचे बळी पडत आहेत. अशातच एका रिपोर्टनुसार उन्हामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. या कॅन्सरला मेलानोमा कॅन्सर असेही म्हणतात. हा कॅन्सर शरीराच्या त्या अंगांमध्ये जास्त असतो ज्यावर सूर्याची किरणे पडतात.


कॅन्सर तज्ञांच्या मते कडक उन्हापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. अधिकाधिक स्वत:ला हायड्रेट कसे ठेवता येईल याची काळजी घेतली पाहिजे. सोबतच दुपारी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत प्रयत्न करा की उन्हात निघणार नाही.



या कारणामुळे होतो कॅन्सर


डॉक्टरांच्या माहितीनुसार कडक उन्हामुळे सकाळी ७ ते ९ दरम्यान घराबाहेर पडा. या दरम्यान व्हिटामिन डी मिळते. यानंतर जे ऊन असते ते नुकसानकारक असते. यामुळे शरीरास अधिक नुकसान होते.


सूर्यापासून निघणारी अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. सोबतच ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना स्किन कॅन्सरचा धोका अधिक असते. दरम्यान, भारतात दुसऱ्या देशांच्या तुलनेने स्किन कॅन्सरचा धोका कमी असतो. गोऱ्या लोकांना स्किन कॅन्सरचा धोका जास्त असतो.

Comments
Add Comment