
दोघांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापणार!
मुंबई : शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांना 'मुख्यमंत्री' करण्यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून दोघेही एमकेकांवर शब्दांची फेकाफेक करीत असल्यामुळे नजिकच्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी 'नालायक', 'कोडगं' म्हणत फडणवीसांवर टीका केली होती. तर त्यांच्या टिकेला 'जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल,' असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण तापणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.
"आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितले होते, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. शिवसेना आणि भाजपा यांच्यात सत्तेचे सम-समान वाटप होईल. शिवसेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद पद असेल, असे अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरले होते. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार होते, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला होता.
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना वेड लागले असेल, मला नाही. कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करतो, असं सांगितल्याचा उद्धव ठाकरेंना भ्रम होता. आता आज भ्रम बदलला असून मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याचे ते बोलत आहे. पण, पहिले उद्धव ठाकरेंनी ठरवावे, मी की अमित शहांनी त्यांना शब्द दिला होता, असे फडणवीस म्हणाले.
आदित्य ठाकरेंना विधानसभा लढविण्याचा मी सल्ला दिला होता. पण, मुख्यमंत्री तर सोडाच, मंत्री बनवण्याचा विचारही नव्हता,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे नजिकच्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.