
खूप पाणी द्या
उन्हाळ्यात मुलांना खूप पाणी प्यायला द्या यामुळे ते हायड्रेट राहतील. तुम्ही त्यांना टेस्टी लागणारे लिंबू पाणीही देऊ शकता.
मोकळे कपडे घाला
नेहमी मुलांना सुती आणि हलके कपडे घालावेत. असे कपडे घातल्याने ते आरामात राहतील आणि त्यांना कमी गरम होईल.
सनस्क्रीन लावा
जेव्हा मुले बाहेर जातील तेव्हा चेहऱ्यावर आणि हातांवर सनस्क्रीन लावा. यामुळे त्यांचा सूर्याच्या किरणांपासून बचाव होईल.
थंड जागी खेळू द्या
उन्हापासून मुलांचा होईल तितका बचाव करा. संध्याकाळच्या वेळेस थंड ठिकाणी त्यांना खेळण्यास द्या. यामुळे ते खुश आणि ताजेतवाने होतील.
खाण्यात फळे आणि भाज्या द्या
उन्हाळ्यात मुलांना खाण्यासाठी हलके अन्न द्या. अनेक फळे तसेच भाज्यांचा आहारात समावेश करा.