Sunday, May 18, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Amitabh Bachchan : 'Kalki 2898 AD' चित्रपटातील बिग बींचा 'हा' लूक पाहिलात का?

Amitabh Bachchan : 'Kalki 2898 AD' चित्रपटातील बिग बींचा 'हा' लूक पाहिलात का?

चाहत्यांचे वेधले लक्ष; लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कल्कि 2898 AD' या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणार असून त्यांचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे. त्यांच्या या भन्नाट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


'कल्कि 2898 AD' या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच दाक्षिणात्य सुपस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच कमल हसन आणि दिशा पटानी हे कलाकार देखील कल्कि 2898 AD या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत.



असा आहे अमिताभ बच्चन यांचा लूक


समोर आलेल्या बिग बींच्या पोस्टरमध्ये ते साधूच्या अवतारात दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर पट्ट्या आहेत. अमिताभ बच्चन यांचा लूक आता समोर आला आहे. आता चित्रपटात ते कोणत्या भूमिकेत झळकणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.



'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज


तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ९ मे २०२४ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. अमिताभ बच्चन यांच्या या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)




Comments
Add Comment