Sunday, May 18, 2025

ताज्या घडामोडीक्राईम

Crime: धक्कादायक! ५८ वर्षीय आजोबाकडून नातीवर तब्बल १० वर्षे अत्याचार

Crime: धक्कादायक! ५८ वर्षीय आजोबाकडून नातीवर तब्बल १० वर्षे अत्याचार

मुंबई : आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना मुंबईतल्या मालाड परिसरात समोर आली आहे. या ५८ वर्षीय नराधम आजोबाने त्याच्याच नातीवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार पीडित मुलगी सज्ञान झाल्यावर तब्बल १० वर्षाने उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मालाडच्या कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कुरार येथे रहाणा-या एका नराधम सावत्र आजोबाने २०१४ मध्ये घरात कोणी नसल्याची संधी साधून खेळण्याबागडण्याच्या वयात असलेल्या १० वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. या अत्याचाराची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी या आजोबाने नातीला दिली होती. त्यामुळे घाबरलेली ही पीडित मुलगी गेली अनेक वर्षे हा अत्याचार निमुटपणे सहन करत होती.


पीडित मुलगी आता सज्ञान झाली असून या १९ वर्षीय नातीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही या धक्कादायक घटनेची दखल गांभीर्याने घेतली आहे. या घटनेची रितसर तक्रार नोंद करुन पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


या आजोबा विरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून कुरार पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment