Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Bus Accident : ट्रकला ओव्हरटेक करताना बसचा भीषण अपघात! २१ पोलीस जखमी

Bus Accident : ट्रकला ओव्हरटेक करताना बसचा भीषण अपघात! २१ पोलीस जखमी

होमगार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती बस

नागपूर : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या अनेक घटना (Accident news) समोर येत आहेत. त्यातच आज ट्रकला ओव्हरटेक करताना बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे. नागपूर-भोपाळ महामार्गावरील बरेठा घाटाजवळ आज पहाटे चारच्या सुमारास होमगार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छिंदवाडा येथून ड्युटी संपवून सैनिकांनी भरलेली बस बरेठा घाटावर आली तेव्हा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली. धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

छिंदवाडाहून राजगढला जाणाऱ्या या बसमध्ये ४० जण होते, ज्यात ३४ होमगार्ड शिपाई आणि ६ पोलीस होते. अपघातात २१ जण जखमी झाले असून १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले असून ९ गंभीर जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment