
'नाची...डान्सर.. बबली..' या नवनीत राणांवरील आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर रवी राणा भडकले
एखादी महिला बाहेर येऊन काम करते म्हणजे स्वाभिमान विकत नाही : नवनीत राणा
अमरावती : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायम बेताल वक्तव्ये करुन वादाच्या भोवर्यात सापडतात. आतापर्यंत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत. त्यातच आता भाजपच्या महिला उमेदवाराविषयी अत्यंत नीच दर्जाची टीका करुन त्यांनी स्वतःहून संकट ओढावून घेतले आहे. भाजपच्या अमरावतीतील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर आता नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले आहेत.
नवनीत राणा म्हणाल्या, कोण आहे संजय राऊत? सीतेला पण भोग चुकले नाही. आपण तर राजकारणात आहे. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे पाहायला हवे होते. माझ्यावर टीका करण्याअगोदर आपल्य पत्नीकडे तरी एकदा पाहायचे होते. एखादी महिला जर बाहेर येऊन काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही. अमरावतीची तर मी सून आहे. नवनीत राणांसोबत अमरावतीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान, सन्मान जोडला गेला आहे.
अमरावतीत तुझ्यासारखे छप्पन्न गाडण्याची ताकद
नवनीत राणांचे पती रवी राणा यांनी देखील राऊतांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रवी राणा म्हणाले, संजय राऊत अमरावतीला येऊन गेला. अतिशय खालच्या पातळीवर नवनीत राणांवर टीका केली. अतिशय खालच्या पातळीवर टीका केलेला संजय राऊत आता जनाब संजय राऊत झाला आहे. जनाब संजय राऊत, सून ले मेरी बात. तू अमरावतीला येऊन नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली. एक लक्षात ठेव ही अमरावती आहे. या अमरावतीत तुझ्यासारखे छप्पन्न गाडण्याची ताकद आहे. हिंदू शेरणी म्हणून आता नवनीत राणा पुढे आल्या आहेत. १४ दिवस जेलमध्ये ठेवून देखील पोट भरले नाही वर परत तुम्ही अमरावतीला येऊन गाडण्याची भाषा बोलता? असा परखड सवाल करत रवी राणा यांनी राऊतांवर टीका केली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले होते की, ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची...डान्सर.. बबली.. तुम्हाला खुनावेल.. पडद्यावरून इशारे करेल.. पण भुरळून जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते, अशी अत्यंत आक्षेपार्ह टीका संजय राऊतांनी केली होती.