Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीLoksabha Election: मतदान केंद्रांवर नक्की चाललंय काय? मणिपूरमध्ये गोळीबार तर पश्चिम बंगालमध्ये...

Loksabha Election: मतदान केंद्रांवर नक्की चाललंय काय? मणिपूरमध्ये गोळीबार तर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये मणिपूरच्या दोन मतदारसंघांत मतदान होत आहे. या मतदानादरम्यान मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराहट पसरली असून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर लोक पळत असल्याचे दिसत आहे. या गोळीबारात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर येथे अधिक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मणिपूरच्या इम्फाळ पूर्व येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर दगडफेक

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधील एका मतदान केंद्रावर दगडफेक झाली असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -