दमोह: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर आपल्या रॅलीतील भाषणादरम्यान जोरदार टीका केली आहे. जे देश दहशतवाद निर्यात करत होते ते साध्या पीठासाठी संघर्ष करत आहेत. पंतप्रधानांनी हे विधान मध्य प्रदेशच्या दमोह येथे निवडणुकीच्या रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना म्हटले.
पंतप्रधान टीका करताना म्हणाले, जगातील अनेक देश ज्यांची स्थिती खूपच खराब आहे. अनेक जण दिवाळखोरीची शिकार बनले आहेत. इतकं की आमच्या शेजारील देश जो दहशतवादाला प्रोत्साहन देत होता त्यांना आता पीठ मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे भारत देश जो परदेशातून हत्यारे खरेदी करत होता आता दुसऱ्या देशांना उच्च तंत्रज्ञानाची हत्यारे निर्यात करत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील लोकांनी केंद्रात एक मजबूत आणि स्थिर सरकारसाठी मतदान केले पाहिजे. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की त्यांचे सरकार राष्ट्र प्रथम या सिद्धांतावर काम करते आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकासह पश्चिमेकडून दबाव असताना रशियाकडून तेल खरेदी भारताच्या पावलाबाबत बचावात्मक भूमिका घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील लोकांना स्वस्त तेल मिळावे तसेच शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही गेल्या १० वर्षांत पाहिले की एक स्थिर सरकार लोकांच्या हितामध्ये कसे काम करते. कोरोनाच्या संकटादरम्यान जगभरात अराजकता होती मात्र एका मजबूत भाजप सरकारने जगभरातील आपल्या नागरिकांना माघारी आणले.