Friday, October 31, 2025
Happy Diwali

Health Tips:ही फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका, होईल नुकसान

Health Tips:ही फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका, होईल नुकसान

मुंबई: फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दररोज एक अथवा दोन फळे खाल्ली पाहिजेत. मात्र अनेकांची सवय असते की ते फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पितात. या कारणामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान सोसावे लागते.

सफरचंद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यात फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्थाही सुधारते. मात्र जर सफरचंद खाल्ल्याने लगेचच पाणी पित असाल तर हे नुकसानदायक ठरू शकते.

सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि खोकल्याची समस्या सतावू शकते. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि अपचन तसेच गॅसची समस्या होऊ शकते.

केळीमध्ये हेल्दी फॅटस आणि कॅल्शियम असते. केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे सर्दी खोकल्याची समस्या होऊ शकते.

केळी खाल्ल्यावर शरीरात इन्सुलिन मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. काकडी खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. कारण यात ९५ टक्के पाणी असते. जर हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायले तर पचनसंस्थेवर परिणाम होतो.

कलिंगड अथवा खरबूज खाल्ल्यानंतरही पाणी प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या सतावते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा