
जाणून घ्या आज कोणत्या ठिकाणी पार पडत आहे मतदान...
मुंबई : भारतात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत १८ व्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांची निवड करण्यासाठी सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. ४ जून २०२४ रोजी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी आजपासून मतदानाचा (Voting) पहिला टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात विदर्भातील (Vidarbha) रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे.
देशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. २१ राज्यांमध्ये १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सकाळी ७ वाजता मतदान सुरु झाले आहे तर ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असणार आहे.
आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झालं आहे.
भंडार-गोंदिया - ५६.८७ % मतदान
चंद्रपूर - ५५.११% मतदान
गडचिरोली चिमूर - ६४.९५% मतदान
नागपूर - ४७.९१% मतदान
रामटेक - ५२.३८% मतदान
मतदान केंद्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्वाधिक मतदान गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंतच मतदान असणार आहे. हा नक्षली भाग असल्याने वेळेची मर्यादा आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होत आहे.