Tuesday, November 25, 2025

Filmfare Awards Marathi 2024 : फिल्मफेअर विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर! महत्त्वाच्या पुरस्कारांवर कोणी कोरले नाव?

Filmfare Awards Marathi 2024 : फिल्मफेअर विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर! महत्त्वाच्या पुरस्कारांवर कोणी कोरले नाव?

आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर अंकुश चौधरी सर्वोत्कृष्ट अभिनेता

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards Marathi 2024) नुकताच पार पडला. यंदाच्या फिल्मफेअर (Filmfare Awards) मराठी पुरस्कार सोहळ्याचे गुरुवारी (१८ एप्रिल) रात्री आयोजन करण्यात आले होते. यंदा कोणत्या सिनेमाच्या टीमने सर्वाधिक पुरस्कार मिळवले तसेच महत्त्वाच्या पुरस्कारांवर कोणी नाव कोरले अशा सगळ्या विजेत्यांच्या नावांची यादी समोर आली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘बापल्योक’, ‘बाईपण भारी देवा’, ‘वाळवी’, ‘उनाड’, ‘झिम्मा २’, या मराठी सिनेमांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाचं (Winners List) लक्ष लागून राहिलं होतं.

अखेर फिल्मफेअर मराठी २०२४ या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन यावर्षी सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ या दोन अभिनेत्यांनी पार पाडले. शिवाय प्राजक्ता माळी, वैभव तत्त्ववादी या सहकलाकारांनी पुरस्कार सोहळ्यात लाइव्ह परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, हिंदी मनोरंजनविश्वातील नवाजुद्दीन सिद्दिकी आणि तेजस्वी प्रकाश यांनी देखील फिल्मफेअर मराठीला उपस्थित होते.

फिल्मफेअर मराठी २०२४ : विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट : आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (Critics) : बापल्योक, नाळ २

सर्वोत्कृष्ट अभिनेता : शशांक शेंडे (बापल्योक)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (Critics) : अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी देशपांडे (श्यामची आई)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Critics): रोहिणी हट्टंगडी (बाईपण भारी देवा)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : जितेंद्र जोशी (नाळ २), विठ्ठल काळे (बापल्योक)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अनिता दाते (वाळवी), निर्मिती सावंत (झिम्मा २)

सर्वोत्कृष्ट गीत : गुरु ठाकूर- (उनाड)

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : महाराष्ट्र शाहीर – अजय-अतुल

सर्वोत्कृष्ट गायक : जयेश खरे, मयुर सुकाळे (महाराष्ट्र शाहीर)

सर्वोत्कृष्ट गायिका : नंदिनी श्रीकर (उनाड)

सर्वोत्कृष्ट कथा : आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले : मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी (वाळवी)

सर्वोत्कृष्ट संवाद : परेश मोकाशी (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन : अनमोल भावे (घर बंदुक बिर्याणी)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : LAWRENCE DCUNHA (उनाड)

सर्वोत्कृष्ट एडिटिंग : फैसल महाडिक, इम्रान महाडिक (आत्मपॅम्फ्लेट)

सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष : आशितोष गायकवाड (उनाड)

सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री : प्रियदर्शिनी इंदलकर (फुलराणी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार : त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे (नाळ २)

जीवनगौरव पुरस्कार : सुहास जोशी

Comments
Add Comment