Monday, October 27, 2025
Happy Diwali

Ajit Pawar: मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत

Ajit Pawar: मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत

अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

धाराशिव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशात तिसऱ्यांदा सरकार आले तर ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धाराशिव येथील प्रचार सभेत म्हटले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना गरिबांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आणि पहिले बिल शून्याचे दिले. मात्र नंतर पुन्हा आधीसारखे बिल देण्यास सुरुवात झाली. असे करणे परवडत नाही. मात्र मोदी हे कोणतेही काम करतात, मग ते मागील पुढील विचार करून करतात.

''राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. आता ३०० युनिटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांना येथून पुढे तिसऱ्यांदा मोदींचे सरकार आल्यावर वरील युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.''असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. विकासासाठी आम्ही महायुती मधून लढतोय. विकासाकरिता आम्हाला राज्याचा देखील विकास करून घ्यायचा आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला या कामासाठी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

याआधी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ''मी यापूर्वी अनेकदा आलो. पण धाराशिवमध्ये माझ्या सासरवाडीत एवढी मोठी गर्दी पहिल्यांदा पाहिली. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदींनी या देशाचे नेतृत्व केले. ३ कोटी घर देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >