Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL मध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, धोनीच्या या खास क्लबमध्ये एंट्री

IPL मध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, धोनीच्या या खास क्लबमध्ये एंट्री

मुंबई: आयपीएल २०२४च्या(ipl 2024) ३३व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्यात खेळण्यासोबतच मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे.


खरंतर रोहित शर्माचे आयपीएलच्या करिअरमधील २५०वा सामना आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये २५० ामने खेळणारा दुसरा खेळाडू आहे.


रोहितच्या आधी महेंद्रसिंग धोनीने ही कामगिरी केली होती. धोनीने आतापर्यंत २५६ आयपीएल सामने खेळले आहेत.


या यादीत तिसऱ्या स्थानावर विकेटकीपर दिनेश कार्तिक आहे त्याने २४९ सामने खेळले आहेत.


तर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली २४४ आयपीएल सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.


म्हणजेच विराट कोहली आणि दिनेश कार्तिककडे या हंगामात २५०च्या आकड्याजवळ पोहोचण्याची संधी आहे.


रोहित शर्मा सध्याच्या आयपीएलच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. रोहितने चेन्नईविरुद्ध शतकी खेळी केली होती.

Comments
Add Comment