Saturday, May 17, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL 2024: हा आहे आयपीएलमधील सर्वात महागडा गोलंदाज, ६ सामने २०९ धावा आणि फक्त १ विकेट

IPL 2024: हा आहे आयपीएलमधील सर्वात महागडा गोलंदाज, ६ सामने २०९ धावा आणि फक्त १ विकेट

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये असा एक स्पेशालिस्ट बॉलर खेळत आहे जो आतापर्यंत ६ सामने खेळला आहे. या सर्व ६ सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी केली आहे. मात्र प्रत्येक सामन्यात हा गोलंदाज फ्लॉप ठरला आहे. या स्पेशालिस्ट ऑफ स्पिनरने आतापर्यंत खेळलेल्या ६ आयपीएल सामन्यांमध्ये केवळ एक विकेट घेतली आहे. आम्ही बोलत आहोत रवीचंद्रन अश्विनबद्दल. अश्विन राजस्थान रॉयल्ससाठी खेळत आहे.


ऑफ स्पिर रवीचंद्रन अश्विनने आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत खेळलेल्या सर्व ६ सामन्यात गोलंदाजी केली. लखनऊ सुपरजायंट्सचा सामना सोडल्यास अश्विनने एकही विकेट घेतलेला नाही. अश्विनने २४ मार्चला खेळवण्यात आलेल्या सामन्यात लखनऊविरुद्ध ४ ओव्हरमध्ये ३५ धावा देत एक विकेट घेतला होता. अश्विनने मार्कस स्टॉयनिसला विकेटकीपर ध्रुव जुरेलच्या हाती कॅच देत बाद केले होते.


३७ वर्षीय अश्विनने यानंतर ५ आणखी सामने खेळले. मात्र यातील एकाही सामन्यात त्याला विकेट मिळालेला नाही. अश्विनने स्पर्धेत आतापर्यंत २३ षटके गोलंदाजी केली. अश्विनने २३ षटकांत २०९ धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीची सरासरी २०९.०० आणि स्ट्राईक रेट १३८.०० आहे.



टी-२० विश्वचषकासाठी संघातील दावेदार


आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत ७९ गोलंदाजांनी एक अथवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतले आहेत. या ७९ गोलंदाजांमध्ये अश्विनचे नाव सगळ्यात खाली आहे. अश्विनच्या चाहत्यांना तो फॉर्ममध्ये परतण्याची आशा आहे. अश्विन भारतासाठी गेल्या दोन वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात रवीचंद्रन अश्विनला भारतीय संघातील निवडीचा दावेदार मानला जात आहे.



राजस्थान रॉयल्सने ७ पैकी ६ सामन्यांत मिळवला विजय


अश्विनसाठी दिलासादायक बाब म्हणजे त्याच्या खराब कामगिरीचा परिणाम राजस्थान रॉयल्सच्या निकालावर झालेला नाही. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या ७ पैकी ६ सामन्यांत विजय मिळवला आहे. ते पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. अश्विनने आतापर्यंत ३ सामन्यांत बॅटिंग केली आणि ५३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या २९ आहे.

Comments
Add Comment