मुंबई: आयआरसीटीसी(irctc) भूतानसाठी(bhutan) स्पेशल पॅकेज आणले आहे. आम्ही तुम्हाला या पॅकेजचे डिटेल्सबद्दल सांगणार आहोत.
भूतान आपल्या नैसर्गिक सुंदरतेबद्दल तसेच आपल्या विशेष संस्कृतीबद्दल संपूर्ण जगात फेमस आहे. जर तुम्हाला हिरव्यागार पर्वतांची सफर करायची आहे आयआरसीटीसी भूतानच्या पॅकेजमध्ये बुकिंग करू शकता.
या पॅकेजचे नाव Bhutan The Land Of Happiness Ex Delhi. हे एक फ्लाईट पॅकेज आहे. यात तुम्हाला दिल्लीवरून पारोची फ्लाईट मिळेल. यानंतर थिंपूला आणले जाईल.
या पॅकेजमध्ये तुम्ही थिंपूशिवाय पुनाका आणि पारोची सैर करण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये सर्व प्रवाशांना ३ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळेल.
यासोबतच मीलमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तीनची सुविधा मिळेल. पॅकेजमध्ये इंग्लिश बोलणारा टूर गाईड मिळेल.
८० वर्षांपर्यंतच्या नागरिकांना ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्ही भूतानच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांची सैर करण्याचा लाभ मिळेल.
भूतानच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला सिंगल ऑक्युपेन्सीला ९६ हजार रूपये प्रती व्यक्तीच्या हिशेबाने शुल्क द्यावे लागेल. तर डबल ऑक्युपेन्सीला ७९ हजार रूपये प्रती व्यक्ती आणि ट्रिपल ऑक्युपेन्सीला ७५ हजार रूपये प्रती व्यक्ती द्यावे लागेल.
या पॅकेजचा लाभ तुम्ही १ जून ते ६ जून २०२४दरम्यान उचलू शकता. पॅकेजची अधिक माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.