Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीजिओचे हे आहेत २ जबरदस्त प्लान्स, मिळतील भरपूर फायदे

जिओचे हे आहेत २ जबरदस्त प्लान्स, मिळतील भरपूर फायदे

मुंबई: रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी नेहमीच वेगवेगळे प्लान्स आणत असते. जिओच्या प्रीपेड नेटवर्कमध्ये अनेक पर्याय ग्राहकांसाठी दिले जातात. एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाच्या तुलनेत नवनवे पर्याय ग्राहकांना दिले जातात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या दोन जबरदस्त प्लान्सबद्दल सांगणार आहोत. यात डेली लिमिटशिवाय एक्स्ट्रा डेटाही दिला जातो.

जिओचा ११९८ रूपयांचा प्लान

जिओचा ११९८ रूपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यासोबतच दररोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते.

या प्लानमध्ये युजर्सला १८ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. याशिवाय अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ मोबाईल(Amazon Prime Video), डिस्ने प्लस हॉटस्टार, सोनी लिव्ह, जी५, जिओ सिनेमा प्रीमियमसोबत एकूण १४ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन फ्री मध्ये मिळते. याशिवाय या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड ५ जीची सुविधा दिली जाते.

जिओचा ४४९८ रूपयांचा प्लान

या लिस्टमध्ये जिओचा पुढील प्लान एका वर्षांसाठी म्हणजेच ३६५ दिवसांचा आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि २ जीबी डेटा सोबत एकूण ७८ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो.

इतकंच नव्हे तर या प्लानसोबत युजर्सला अॅमेझॉन प्राईम मोबाईल, डिस्ने प्लस हॉटस्टार, सोनी लिव, जी५, जिओ सिनेमा प्रीमियरसोबत एकूण १४ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड ५ जीची सुविधा दिली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -