Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Raj Thackeray : महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी दिसणार एकाच मंचावर

Raj Thackeray : महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी दिसणार एकाच मंचावर

शिवाजी पार्कवर होऊ शकते सभा

पुणे : लोकसभा, राज्यसभा नको तर विधानसभेच्या तयारीला लागा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढी पाडवा मेळाव्यादिवशी त्यांनी ही मोठी घोषणा केली. हा पाठिंबा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळे देत असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी एक मोठी बातमी दिली आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना दिली.

मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात अमित ठाकरे आज प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबाबत ते पदाधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत. यावर आता मनसेने पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यावेळी कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यावेळी लवकरच प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज अमित ठाकरे यांनीही याबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >