Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीMalaika Arora: 'डंब बिर्याणी' पॉडकास्टवर मलायकाच्या मुलाने विचारले अजबगजब प्रश्न

Malaika Arora: ‘डंब बिर्याणी’ पॉडकास्टवर मलायकाच्या मुलाने विचारले अजबगजब प्रश्न

नेटकरी म्हणतात, ”हे कुटुंब नॉर्मल दिसत नाही”

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान (Arhaan khan) याचे ‘डंब बिर्याणी’ नावाचे पॉडकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अरबाज खान आणि सोहेल खान यानंतर आता खुद्द मलायका हजेरी लावणार आहे. अरहान त्याच्या मित्रांसोबत या पॉडकास्टमध्ये प्रेम, रिलेशनशिप या सर्व विषयांवर गप्पा मारताना दिसतो. अरबाज खान आणि सोहैल खान यांनी पॉडकास्टमध्ये विविध मुद्द्यांवरून मोकळेपणे गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर आता मलायका मुलाच्या शोमध्ये येणार आहे. यावेळी मायलेकामध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. या पॉडकास्टच्या प्रोमोमध्ये अरहान हा मलायकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर त्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरांमुळे नेटकरी अवाक् झाले आहेत.

‘डंब बिर्याणी’ या वॉडकास्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या एपिसोडचा रंजक टीझर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये मलायका तिच्या मुलाला थेट विचारते की, “तुझं कौमार्यभंग (व्हर्जिनिटी लूज) कधी झालं?” आईच्या तोंडून हा प्रश्न ऐकताच अरहान नि:शब्द झाला. पण क्षणभर विचार केल्यानंतर त्याने आईलाच प्रतिप्रश्न विचारला. “तुला लोकांमध्ये मिळून-मिसळून राहायला आवडतं का?” मुलाच्या या प्रश्नावर मलायका नकारार्थी उत्तर देते. यानंतर अरहान तिला आणखी मोठा प्रश्न विचारतो. “तू लग्न कधी करतेय?”, असं तो आईला विचारतो.

अरहानच्या प्रश्नाला मलायकाचे हटके उत्तर

पॉडकास्टच्या प्रोमोमध्ये दिसते की, अरहान मलायकाला विचारतो, “तू सोशल क्लांबर आहेस?” मलायका याचं उत्तर देते, “मी नाहीये.” त्यानंतर अरहा मलाइकाला विचारतो, “आई, तू लग्नकधी करणार” या प्रश्नाचे मलायकाने उत्तर दिले, तुला याचं खरं उत्तर पाहिजे? मी याचं खूप स्पायसी उत्तर देऊ शकते.” मलायकाच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. मायलेकामधील हा संवाद ऐकून नेटकरीसुद्धा अवाक् झाले आहेत. हे कुटुंबच नॉर्मल नाही, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -