
मुंबई: आयपीएल २०२४चा(ipl 2024) ३१वा सामना ईडन गार्डन्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थानने हरत असलेला डाव जिंकत कोलकाताला मात दिली. राजस्थानसाठी सलामीसाठी उतरलेल्या जोस बटलरने नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवू दिला. २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बटलरने ६० बॉलमध्ये नाबाद १०७ धावा केल्या. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये किती बदल झाला घ्या जाणून...
विजय मिळवणारा राजस्थान रॉयल्सचा संघ १२ पॉईंट्स आणि +०.६७७च्या रनरेटसोबत अ्व्वल स्थानावर आहे. तर हरणारा केकेआरचा संघ ८ गुण आणि +1.399च्या रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, ३१व्या सामन्याआधीही दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होती. राजस्थानने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत यात त्यांना ६ सामन्यात विजय मिळाला आहे. दुसरीकडे कोलकाताने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यापैकी ४ सामन्यात विजय मिळाला आहे.
हे आहेत टॉप ४ संघ
पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स ८ गुणांसह दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स ८ गुणांसह तिसऱ्या आणि सनरायजर्स हैदराबाद ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. चेन्नईकडे +0.726 आणि हैदराबादकडे +0.502 असा मजबूत रनरेट आहे. चेन्नई आणि हैदराबादने ६ सामने खेळले आहेत त्यातील प्रत्येकी ४ सामन्यात त्यांना विजय मिळाला.
बाकी संघ अशा स्थितीत
इतर संघांवर नजर टाकली असता लखनऊ सुपर जांयंट आणि गुजरात टायटन्से प्रत्येकी ६-६ गुण आहेत. ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. लखनऊकडे +0.038 आणि गुजरातकडे -0.637 चा नेट रनरेट आहे. यानंतर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे ४-४ गुण असून ते अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.