मुंबई: खराब लाईफस्टाईल आणि खाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना हल्ली लोकांना करावा लागतो. आजकाल लोक आपल्या सकाळची सुरूवात चहा आणि कॉफीने करतात. मात्र तुमच्या माहितीसाठी म्हणून ही सवय आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करा. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकल्यास आरोग्य चांगले राहते. कोमट पाण्यास लिंबू टाकून प्यायल्याने शरीराला गरजेची पोषकतत्वे मिळतात.
दररोज सकाळी गरम पाण्यात टाका हळद आणि लिंबू
खराब लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लोकांचे वजन वेगाने वाढत आहे. वाढत्या वजनामुळे डायबिटीज तसेच हाय बीपीचा त्रास लोकांना होत आहे. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात आरोग्यदायी करायची आहे तर तुम्ही हे खास ड्रिंक प्या. या ड्रिंकमध्ये हळद आणि लिंबू मिसळा. यामुळे वजन नियंत्रणात राहते. लिंबू आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.
व्हिटामिन सी मध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. हळद आणि लिंबू एकत्र करून बनवलेले पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. हे प्यायल्याने आतड्याची तसेच लिव्हरची सफाई होते.