मुंबई : रामनवमी हा हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा-अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्री रामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो. रामनवमीच्या पूजेसोबतच या काही गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.
रामनवमीला रामाची पूजा करताना रामरक्षास्तोत्र अवश्य पाठ करा. राम मंत्र, हनुमान चालीसा इत्यादींचे पठण केल्याने शाश्वत पुण्य तर मिळतेच त्यासोबत संपत्तीतही वाढ होण्याची शक्यताही जागृत होते.
रामनवमीला दुर्गामातेची पूजा आणि कन्या पूजेनंतर या गोष्टी दान करा-
- रामनवमीच्या दिवशी गरीब आणि असहाय्य लोकांना दान आणि अन्नदान केल्याने तुम्हाला अनेक पटींनी पुण्य मिळेल. रामनवमीच्या दिवशी आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद अवश्य घ्या.
- रामनवमीच्या दिवशी जवळच्या राम मंदिरात जा, दिवा लावा, प्रसाद द्या आणि पूजा झाल्यावर प्रसाद जास्तीत जास्त लोकांना वाटा. नवमीच्या दिवशी अविवाहित मुलींना अन्नदान करा. यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन लोकांना आशीर्वाद देतात.
- हिंदू धर्मात अन्नदान सर्वोत्तम मानले जाते. भुकेल्या किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान केल्याने देव प्रसन्न होतो. तथापि, आपण कधीही खराब झालेले किंवा शिळे अन्न दान करू नये याची विशेष काळजी घ्या. असे करणे म्हणजे अन्न ग्रहण करणाऱ्या व्यक्तीचा आणि माता अन्नपूर्णाचा अपमान आहे.
- रामनवमीला मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि दुधात कुंकू टाकून देवाला अभिषेक करा यामुळे जीवनात धनसंपत्ती मिळते. असा उपाय केल्याने जीवनात आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
- याशिवाय रामनवमीला तुम्ही तुमच्या भक्तीनुसार गरिबांना कपडे आणि अन्न दान करू शकता.