Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीनवी मुंबई, ठाण्यात बत्ती गुल, प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल

नवी मुंबई, ठाण्यात बत्ती गुल, प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल

नवी मुंबई : एकीकडे उन्हाचा दाह वाढत असताा दुसरीकडे महापारेषणच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नवी मुंबईत ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात अनेक तासांपासून बत्ती गुल झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले.

नवी मुंबई परिसरात सध्या वीजेची मागणी मोठी आहे, त्यामध्ये 750 मेगा वॅट वीज कमी पडताना दिसत आहे. मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडल्याने, वीजेची मागणी वाढल्याने लोड आल्याने तांत्रिक बिघाड झाला होता.

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला. यात राज्यात पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात पारा तीन ते पाच अंश वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारा ४० अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढू शकतो. या काळात उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकते. एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय, तर दुसरीकडे पुण्यासह मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा चढण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा चढता राहणार आहे. मराठवाड्यात चार दिवसांच्या कालावधीत ३ ते ५ अंशांनी कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते. कोकण विभागात आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होईल. त्यामुळे मुंबईकरांना तसेच कोकण किनारपट्टीवर अधिक अस्वस्थता जाणवू शकेल. या कालावधीमध्ये दीर्घकाळ उन्हात राहू नये असे प्रादेशिक हवामान विभागाने सुचवले आहे. तसेच पाणी पिणे, सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा अन्य कपडा घेणेही अपेक्षित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -