Albattya Galbattya: अमावस्येच्या रात्रीला साथ आहे रातकिड्यांची; बच्चेकंपनीला साद घालतेय ‘3D’ जादू ‘चेटकिणीची’!

Share

अलबत्त्या गलबत्त्या नाटकानंतर होणार सिनेमात रुपांतर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई : चिंची चेटकीण आणि गुप्तधनाची गोष्ट सांगणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या (Albattya Galbattya) नाटकाने चांगलीच रंगभूमी गाजवली होती. ‘अलबत्त्या गलबत्त्या’ पेक्षा चिंची चेटकीण जास्त लोकप्रिय झाली. छोट्या प्रेक्षकांसह मोठ्यांनीही या नाटकला उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता. आता हे नाटक सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

सिनेमाच्या टीझर मध्ये वैभव चिंची चेटकिणीच्या रूपात दिसत असून “किती गं बाई मी हुशार” हे चेटकिणीचं लाडकं वाक्य ऐकू येतं. या टीझरने सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच या टीझरवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स करत या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘अलबत्त्या गलबत्त्या’ या चित्रपटात वैभवसोबत अक्षय मिटकल, शंतनू गांगणे, लोकेश मांगडे, मनीष पिंपुटकर, अनुष्का पिंपुटकर, विराज टिळेकर, अभय पिंपुटकर, सोनिया सहस्त्रबुद्धे, यांच्या मुख्य भूमिका आहेत. वरुण नार्वेकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून थ्री डी रूपात बच्चेकंपनीला हा सिनेमा एन्जॉय करता येणार आहे. संजय छाब्रिया, सुधीर कोलते आणि ओंकार माने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

रत्नाकर मतकरी यांनी नाटक स्वरूपात लिहलेल्या या अलबत्त्या गलबत्त्या गोष्टीवर आधारित सिनेमा येत असून सिनेमाच्या दृष्टीने त्यात कथानकात काय बदल झाले असतील हे पाहणं चित्तवेधक असणार आहे. १ मे २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

1 hour ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

1 hour ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago